आंब्यांच्या लोभात अडकलेले मित्र
मित्रांनो, ही गोष्ट आहे! माझ्या मित्रासोबत घडलेली आणि इतकी मजेदार आठवण आहे की आजही आठवलं की पोट दुखेपर्यंत हसू येतं.
विजय नावाचा एक मुलगा होता. आठवीत शिकत होता. अभ्यासात फारसा हुशार नव्हता , पण खेळांमध्ये मात्र तो एकदम “निष्णात”! विशेषतः व्हॉलीबॉलमध्ये तर त्याला कोणी सरस नव्हतं. चेंडू हवेत गेला की तो इतक्या स्टाईलमध्ये स्मॅश मारायचा की शिक्षकांपासून गावकरीपर्यंत सगळे टाळ्या वाजवत बसायचे. गावात तर म्हण होती –
“व्हॉलीबॉलचा खरा राजा म्हणजे विजय!”
पण एक गोष्ट खरी – जितका तो खेळात निष्णात, तितकाच खोड्यांमध्ये
! 😅
दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आपल्या आजीच्या कोकणातील गावाला जायचा. तिथे त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेलाच – सकाळी उठून मित्रांसोबत क्रिकेट, फुटबॉल, झाडावर चढणं असं धमाल चालायचं. दुपारी मात्र त्यांचा स्पेशल प्लॅन – जवळच्या तळ्यात पोहायला जाणं.
आणि परतीच्या वाटेवर? अहो, तिथेच खरी मजा होती! वाटेत आमराई होती. तिथले आंबे म्हणजे गोडीचा खजिना. मग काय – रोज पोटभर आंबे खायचे आणि पिशव्यांत भरून घरी आणायचे. हा त्यांचा “गुप्त कार्यक्रम” होता.
पण… समस्या अशी की आमराईचा मालक रोज डोकं खाजवत होता –
“हे रोज आंबे गायब कसे होतात? झाडं स्वतः आंबे खाते की काय?” 🤔
शेवटी त्याने ठरवलं – “आज मी पाळत ठेवतोच!”
दुसरीकडे विजय आणि त्याचे दोस्त बिनधास्त. पण त्या दिवशी त्यांना जरा संशय आला की कुणीतरी बघतोय. त्यांनी दोन दिवस आमराई टाळली. पण तिसऱ्या दिवशी? लोभ आवरेना!
“अरे यार, दोन दिवस झाले आम्रासुरांचा आस्वाद नाही. चला जाऊया आज!” विजय म्हणाला.
मित्रही लगेच तयार – “चल, पटकन करून टाकूया!”
तळ्यात पोहून झाले, आणि मग हळूच आमराईत शिरले. पटकन झाडावर चढले, आंबे तोडले, पिशव्या भरल्या आणि म्हणाले,
“आज तर माल भारी मिळाला, चला आता पळूया!”
पण तेवढ्यात – धाड!! 😲
झाडामागून आमराईचा गडी बाहेर आला. त्याच्या हातात मोठ्ठा काठी!
“ए हेरो, थांबा जरा! आजचे आंबे नाही, थेट शिक्षा मिळणार आहे!” तो ओरडला.
चारही मित्र थिजले. विजय म्हणाला –
“अरे पळा रे!”
पण गडी तर गडगडणाऱ्या बैलासारखा मागे लागला. धावताधावता सगळ्यांना पकडलं.
आधी प्रत्येकाच्या पाठीवर एकेक फटका – ठ्यॅक! ठ्यॅक!
मित्र ओरडत: “आय हाय आई गं!” 😖
आणि नंतर? चौघांना एकत्र झाडाला दोरीने बांधून ठेवलं!
दुपारी बांधले, आणि संध्याकाळपर्यंत सोडलंच नाही. गावातले लोक जाताना बघायचे, हसायचे –
“अरे वा, आम्रचोर पकडले गेले!”
काही तर म्हणायचे – “वा रे वा, आंब्याच्या बदल्यात थेट ‘फ्री नाटक’!”
शेवटी मित्रांनी हात जोडले –
“काका, चूक झाली. पुन्हा कधीही आंबे चोरणार नाही. हवे असतील तर मागू, पण चोरी नाही करू!”
गडीने त्यांना सोडलं. पण त्या दिवशी विजय आणि मित्रांना आयुष्यातली पहिली खरी “आंब्याची शिक्षा” मिळाली.
आणि गंमत म्हणजे – शिक्षा मिळाली असली तरी हीच शिक्षा त्यांच्या आयुष्यातली सर्वात मजेदार आठवण ठरली! आजही ते भेटले की हसत म्हणतात –
“अरे आठवतं का तेव्हा? आंब्यापेक्षा फटकेच जास्त मिळाले होते!”
