आंब्यांच्या लोभात अडकलेले मित्र
मित्रांनो, ही गोष्ट आहे! माझ्या मित्रासोबत घडलेली आणि इतकी मजेदार आठवण आहे की आजही आठवलं की पोट दुखेपर्यंत हसू येतं. विजय नावाचा एक मुलगा होता. आठवीत शिकत होता. अभ्यासात फारसा हुशार नव्हता , पण खेळांमध्ये मात्र तो एकदम “निष्णात”! विशेषतः व्हॉलीबॉलमध्ये तर त्याला कोणी सरस नव्हतं. चेंडू हवेत गेला की तो इतक्या स्टाईलमध्ये स्मॅश मारायचा…
